बारामती – पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानासाहेब काशिनाथ गोफणे (वय 32, रा. सोनगाव, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.मंगेश हनुमंत नेवसे व त्यांचा एक अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अचानक अडवून पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचा खांदा निखळला. तोंडावर व पोटात लाथाबुक्यांनीही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.