बंगळुरू – कर्नाटक राज्य सरकारने उद्या होणाऱ्या प्रजासत्ताकदिनासाठी एक आदेश बजावला असून या आदेशानुसार उद्या प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
२६ जानेवारी रोजी स्वतंत्र भारताने आपले संविधान अंगिकारले होते. उद्या यास ७१ वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात उद्याचा दिवस प्रजासत्ताकदिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे. अशातच आता कर्नाटक सरकारने भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यक्रमामध्ये ठेवण्याचा स्वागताहार्य निर्णय घेतला आहे.
Karnataka Government has passed an order instructing to put Dr BR Ambedkar’s photo at all government programmes during #RepublicDay celebration in the state tomorrow.
— ANI (@ANI) January 25, 2020