जयपूर : (श्रीनिवास वारुंजीकर)- आज भारतात हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व अशा पद्धतीने सरकारकडून मांडणी सुरु आहे. मात्र कोना हिंदू आहे आणि कोण अहिंदू याची चर्चा अथवा निर्णय सरकारने घ्यायचा नाही, तर ते लोकांना ठरवू द्या, असे प्रतिपादन विख्यात वेदिक अभ्यासक ओम स्वामी यानी केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वेदिक हिंदू धर्माच्या प्रचारार्थ आपला आश्रम सिडनीमध्ये चालवता असलेल्या ओम स्वामी यांनी आज जयपूर लिटरेचर फेसटीव्हलमध्ये आपले विचार मांडले. त्यावेळी ते बोलता होते.

ओम स्वामी पुढे म्हणाले की सर्वाना बरोबर घेऊन जाणारा आणि अवघे विश्वची माझे घर अशी धारण असलेला हिंदू धर्म आहे, हे सगळ्यांना माहिती असताना आता नागरिकत्त्वाचे मुद्दे पुढे करून सरकार कोणाला त्रास देणार असेल तर ते हिंदुत्त्वाच्या विचारधारेविरुद्ध आचरण ठरेल. भारतीय तत्त्वज्ञान जरा जागता सर्वात जुने आणि आदर्श मानले जात असेल तारा त्याविरोधात निर्णय घेणारांना आपण माफ कसे करणारा, असा प्रश्न स्वामी यांनी विचारला.

धार्मिकता आणि अध्यात्म या व्यक्तिगत गोष्टी असून हिंदुत्त्वामध्ये धार्मिकता फार थोडी आणि सामाजिकता खूप मोठी आहे. आजवर बहुतांश कथित हिंदुत्त्ववाद्यानी हिंदू धर्माच्य संकल्पनांचा वापर राजकारणासाठीच केला असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य माणूस जेव्हा हॉटेलमध्ये भोजन करायला जातो, त्यावेळी तो हे बघता नाही की आचारी कोण आहे, असे सांगून ओम स्वामी पुढे म्हणाले की, समाजाला कोणत्याही कालखंडात धार्मिक आधारावर विभाजित करणे चूक आहे.

ती पत्रिका काळया कामाची?

आपण जी कुंडली मांडतो, टी मला मान्य नाही असे सांगून ओम स्वामी म्हणाले की, या कुंडलीमध्ये १२ घरे असतात आणि ग्रहमालेत ९ ग्रह आहेत. यामध्ये राहू-केतू हे काल्पनिक ग्रह असून सर्वात महत्त्वाचा जीवसृषटी असलेला पृथ्वी हा ग्रहाचा नाही. जरा आपली सूर्यमाला ‘मिल्की वे’ या आकाशगंगेचा भाग आहे, तर या आकाशगंगेतील हजारो इतर ग्रह आपल्या जीवनावर का परिणाम करता नाहीत, असा प्रश्न ओम स्वामी यांनी केला.