केंद्रीय मंत्री गंगवार : भाजप कामगार आघाडीची भेट
रांजणगाव गणपती- सर्वस्तरातील कामगारांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध असून कामगार हिताच्या कायद्यांसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी केले. श्रमशक्ती भवन नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. यावेळी भाजप कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांची असंघटित कामगार, संघटित कामगार, स्वेच्छा निवृत्त कामगार, सेवानिवृत्त कामगार, पीडित कामगार यांच्या समस्यांबाबत तसेच नवीन कामगार कायद्यांबाबत चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंत्राटी कामगार, बांधकाम मजूर, किमान वेतनवाढ, पेन्शन, ईएसआयसी कायद्याबाबत, घरेलू कामगार,माथाडी कामगार आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सुधारणांचा प्रस्ताव मंत्री गंगवार यांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे पालक तथा म्हाडाचे अध्यक्ष संजय केनेकर, भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, सरचिटणीस तथा किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य केशव घोळवे, सहसंयोजक प्रमोद जाधव, संजय जोरले, डॉ. प्रीती व्हिक्टर, डॉ. रेखा बहनवाल, अमित कदम, संतोष करपे, उमेश धोका आदी मान्यवर उपस्थित होते.