मुंबई :अभिनेत्री कंगना रनौत यांनी निर्भयाला प्रकरणातील दोषींना चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. यावर निर्भयाच्या आईने कंगनाच्या विधानाशी सहमत असल्याचे म्हंटले आहे.
कंगनाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल निर्भयाच्या आईने आभार मानले आहेत. फाशीला विरोध करणारे वकील इंदिरा जयसिंगवरही जोरदार टीका केली आहे.
दरम्यान निर्भया प्रकरणातील चारही आरोपीना एक फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात येणार आहे.