नगर – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी राबविण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणाकरीता नगर जिल्हयामध्य 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामिण भागात 374150, शहरी भागात 20087 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्य्े 46878 असे जिल्हयातील एकूण 441115 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. त्यासाठी 562000 पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.
सदर लसीचे वाटप सर्व संस्थांना करण्यात आलेले आहे. रविवारी ग्रामिण भागात 2770 बुथ, शहरी भागात 75 व महानगरपालिका क्षेत्रात 181 असे एकूण जिल्हयामध्ये 3026 बुथवर 7843 कर्मचा-यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
21 जानेवारी 2020 पासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्हयात 101 ट्रांझिट टीमव्दारे बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व 136 माबाईल टिमव्दारे उसतोड कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजूरी करणा-या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
ही मोहिम यशस्वीपणे राबविण्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाची आहे त्यादृष्टीने तयारी सुरु आहे.