सलमान खान सध्या “राधे’ या एकमेव सिनेमामध्ये काम करतो आहे. या सिनेमाचे डायरेक्शन प्रभुदेवा करतो आहे. “राधे’ याच वर्षी ईदच्या सुमारास रिलीज होणार आहे. आता त्याने नवीन सिनेमा स्वीकारायचे ठरवले आहे. त्यापूर्वी तो पूर्वीच घोषणा केलेल्या आणखी एका सिनेमाच्या शुटिंगलाही सुरूवात करू शकतो. त्याने अलिकडेच “कभी दिवाली कभी ईद’नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती. हा त्याचा नवीन सिनेमा 2021च्या ईदच्या सुमारास रिलीज होणार आहे. सलमानने 2021 च्या ख्रिसमसला आपला कोणता सिनेमा रिलीज करायचे हे देखील ठरवले आहे. त्याच्या “किक 2’ची घोषणा होऊन बरेच दिवस झाले आहेत. आता सलमान याच्या शुटिंगल सुरुवात करण्याची शक्यता आहे.
“किक’चे डायरेक्शन केलेल्या साजिद नाडियादवालाकडेच “किक 2’च्या डायरेक्शनचीही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सध्या “किक 2’च्या स्क्रीप्टवर काम सुरू आहे. निम्मी स्क्रीप्ट लिहून पूर्ण झाली आहे. “कभी दिवाली, कभी ईद’चे शुटिंग संपवल्यानंतर सलमान “किक 2’चे शुटिंग सुरू करेल. म्हणजे पुढच्या वर्षी ख्रिसमसला तो रिलीज होईल. याच कालावधीत सलमान आणखीन एक सिनेमाही करेल.