मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रपटाच्या निर्मितीला भारताचे सहकार्य
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज नवी दिल्ली येथे माहिती आणि प्रसारण मंत्री बैठक 2020 मध्ये माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Delhi: Union Information & Broadcasting Minister, Prakash Javadekar met Bangladesh Information Minister, Muhammad H Mahmud, today. India extended its support to establish a film city in Bangladesh. pic.twitter.com/COmIztGj7E
— ANI (@ANI) January 14, 2020
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसेच बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री मोहम्मद एच. महमूद यावेळी उपस्थित होते.
शेख मुजीबूर रेहमान यांच्या 100 व्या जयंती वर्षात प्रकाशित होणाऱ्या “वंगबंधू’ या त्यांच्या चरित्रपटाची सहनिर्मिती करण्याचा औपचारिक करार यावेळी झाला. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांचे 100 वे जयंती वर्ष 17 मार्च 2020 ते 17 मार्च 2021 “मुजीब वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे.
प्रसारभारती आणि बांगलादेश रेडिओ बेतार यांच्यात रेडिओ कार्यक्रमाच्या आदानप्रदानाचा प्रारंभ झाला. ढाका येथे मैत्री सेवेने प्रक्षेपण सुरू केले असून बांगलादेश रेडिओ बेतारचेही कोलकाता आकाशवाणीवरून प्रक्षेपण सुरू केले आहे.
भारत आणि बांगलादेश यांची नैसर्गिक मैत्री असून दोन्ही देशांना समान वारसा आहे. बांगलादेश टीव्ही आणि बेतारसोबत आशय सहनिर्मितीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले. “वंगबंधू फिल्मसिटी’ उभारण्यासाठी भारत बांगलादेशला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे जावडेकर यांनी सांगितले.
भारताच्या पाठिंब्याशिवाय मुक्ती संभव झाली नसती, आपले संबंध ऐतिहासिक असल्याचे बांगलादेशचे माहिती मंत्री मोहम्मद एच. महमूद यांनी सांगितले.