बागवे करंडक फुटबॉल स्पर्धा
पुणे : पुणे कॅन्टोमेंट ब्लॉक आयोजित माजी आमदार बागवे करंडक खुल्या फुटबॉल स्पर्धेत ब्ल्यू स्टॅग एफसी, बोपोडी एफसी आणि रिअल पुणे युनायटेड या संघांनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत ब्ल्यू स्टॅग एफसी संघाने लेजंड् युनायटेड संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. दुसऱ्या सामन्यात बोपोडी एफसी संघाने एफसी जोसफ संघाचा 2-1 असा सहज पराभव केला. बोपोडी संघाच्या प्रशांत तुळकट आणि डॉमनिक अडसुळ यांनी पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये दोन गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्धात ही आघाडी कायम ठेवण्यात बोपोडी संघाला यश आले. उत्तरार्धात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. बोपोडी संघाला आणखी गोल मारण्यात यश आले नाही. एफसी जोसेफ संघाच्या नितीन सोनावणे याने 35 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 1-2 अशी कमी केली.
पण बरोबरी गाठण्यात अपयश आले आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. रिअल पुणे युनायटेड संघाने चेतक ब संघाचा 4-0 असा धुव्वा उडविला.