मुंबई – दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असून अनेक बाॅलिवूड कलाकारांनी याचा निषेध केला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सुद्धा काल संध्याकाळी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचली आणि सोशल मीडियावर ट्रोल झाली. मात्र या भेटीनंतर अनेकांनी तिच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकला आहे.
याचदरम्यान आता दीपिकाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडीओ मध्ये दीपिका काँग्रेस नेते राहुल गांधींची प्रशंसा करताना दिसत आहे.
जेएनयू में ‘आज़ादी’ के नारों का मौन समर्थन करने वाली @deepikapadukone ने क्या कहा था … pic.twitter.com/SeW8leLjL9
— Amish Devgan (@AMISHDEVGAN) January 8, 2020
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. यात दीपिका म्हणाली कि, ” मला राजकारणाबद्दल फार काही माहित नाही… पण जे काही मी टीव्हीवर पाहते त्यावरुन राहुल गांधी आपल्या देशासाठी जे काही करत आहेत ते आपल्या देशासाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे मला वाटते.
ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत… ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील… असे मला वाटते. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे… अशी माझीही इच्छा आहे”. असं दीपिका म्हणाली आहे.