मुंबई – दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) बुरखेधारी हल्लेखोरांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून बाॅलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने काल (दि. ७) विद्यार्थ्यांच्या समर्थनात जेएनयूत हजेरी लावली.
यावेळी माध्यमांशी सवांद साधताना दीपिका म्हणाली कि, “जेएनयूमध्ये जे काही घडलं आहे… त्याची मला चीड आली आहे”. असं दीपिका म्हणाली.
दरम्यान, दीपिका पादुकोण हिची मुख्य भूमिका असलेला छपाक हा चित्रपट दोन दिवसांनी प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर #boycottchhapaak हा ट्रेंड सुरु झाला आहे. तर दुसरीकडे दीपिकाच्या समर्थनार्थ #ChhapakDekhoTapaakse आणि #ISupportDeepika हा ट्रेंड सुरु झाल्याचे दिसत आहे.