इंदूर : भारत-श्रीलंका दरम्यान तीन टी-२० सामन्याच्या मालिकेतील गुवाहाटीतील पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज इंदूर येथील होळकर स्टेडियमवर दुसरा टी-२० सामना होत आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांनी आजच्या सामन्याव्दारे भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. यष्टीरक्षक म्हणून पुन्हा एकदा रिषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त चहरऐवजी नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. सलामीवीर फलंदाज शिखर धवन व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर आज येथे होत असलेल्या भारत व श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात लक्ष राहणार आहे.
भारतीय संघ : शिखर धवन, के एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी
दुसरीकडे, लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने अनुभवी अँजलो मॅथ्यूजला भारत दौ-यासाठी पुन्हा बोलावले होते, मात्र आजच्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
2nd T20I. Sri Lanka XI: D Gunathilaka, WIA Fernando, MDKJ Perera, O Fernando, B Rajapaksa, D de Silva, D Shanaka, I Udana, W Hasaranga, L Kumara, L Malinga https://t.co/OExOCRLv44 #IndvSL @Paytm
— BCCI (@BCCI) January 7, 2020
श्रीलंका संघ : अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणातिलाका, कुसल परेरा, ओशदा फ़र्नांडो, भानुका राजपकसा, धनंजया डी सिल्वा, दसुन शनाका, इसुरू उदाना, वाणिदु हसरंगा, लहिरू कुमारा, लसित मलिंगा (कर्णधार).
दरम्यान, भारताने या मालिकेपूर्वी विंडीजविरूध्दची टी-२० आणि वन-डे मालिका जिंकली आहे. हा विजयी धडाका कायम राखण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा १८ वा टी-२० सामना असून, यापूर्वी १६ टी-२० सामन्यांत भारताने ११ तर श्रीलंकेने ५ विजय नोंदविले आहेत तर गुवाहटी येथील सामना पावसामुळं रद्द झाला होता.