अमेरिका-इराणमधील तणावाचा परिणाम
नवी दिल्ली : अमेरिकेने इराणचा मेजर जनरल सोलेमानी याला ठार केल्यानंतर आता तेलाच्या किंमतीत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या कुद्स दलाचा प्रुख कासिम सोलेमानी याला बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने रॉकेट हल्ला करून ठार केले.
सोलेमानी ठार झाल्याच्या बातमीनंतर तेलाच्या किंमती उसळल्या आहेत. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 4.4 टक्क्यांनी वाढली असून ती 69.16 डॉलर इतकी झाली आहे. तर डब्ल्यूटीआयच्या दरात 4.3 टक्के वाढ झाली असून 63.84 डॉलरपर्यंत पोहचली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इराणचा मेजर जनरल मारल्याने त्यांचे नाक कापल्यापेक्षा हे जास्त आहे. मध्य पूर्व भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण यामुळे निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सोलेमानीला ठार केल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.
याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होई शकते. अरब देशांसह इराणमधूनही भारत क्रूड ऑइलची आयात करत होता. मात्र, अमेरिकेने घातलेल्या निर्बंधानंतर भारताने इराणकडून तेल घेणे बद केले आहे.