तुळस आपल्यासाठी एक महत्वाची औषधी आहे. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, बिजाचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषधी म्हणून करता येतो.
ताप –
लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो
मौखीक स्वास्थ्य टिकवणे –
दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जाते. पुरातन काळात भोजनानंतर तुळसपानांचा स्वाद मुखशुध्दी साठी घेतला जाई. तोंडातील सूज व फोड तूळस खाल्ल्याने बरे होतात . मुखाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते.
दातांची काळजी –
तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्ये यास दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तूळसपाने ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो.
मुत्रपिंडातील खडक –
तुळशीत विषजन्यपदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे गुण असतात त्यामूळे या गुणांमुळे तूळसपानांचा उपयोग मुत्रपिंडातील खडयांवर होतो. पहाटे निर्जळी 4,5 तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळसपाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही. लघवी गरम होत नाही. त्यामूळे मुत्रविसर्जनात वेदना कमी होण्यास फार लाभ मिळतो.
त्वचेची काळजी –
तुळसपानांचा वापर त्वचासंक्रमणावरही होतो. तूळस पानांचा लेप त्वचा संक्रमणावर लावून उन्हात बसल्यास व वाळल्यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास फार लाभ मिळतात. स्त्रिया तुळसपानाच्या लेपास उत्तम शरीर माॅश्चरायझर म्हणून वापरतात. स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.
डोकेदुखी –
फार डोके दुखणे ( मायग्रेन ), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळसपानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळसतेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो. केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते. तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदूखी कमी केल्या जाते.
कमी वयात वयस्कपणा वाढीवर उपाय –
तुळशीमधील जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले एंटी आॅक्सीडेंट नी भरलेले असतात त्यामूळे शरीरास टवटवीत आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. पाण्यासोबत तुळसपानांचा रस घेतल्यास शरीरातील विविध संस्था निटपणे कार्य करतात त्यामूळे शरीरास वृध्दावस्था लवकर येत नाही.