इराक : अइराकची राजधानी बगदाद येथील विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा लष्लरी कमांडर ठार झाला. परदेशातील अमेरिकेन नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आणि इराणच्या आक्रमाणाच्या भविष्यातील योजना हाणून पाडण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनने म्हटले आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख सोलेइमानी आणि इराणचा पाठींबा असणाऱ्या इराकी पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सेसचा (पीएमएफ) उपप्रमुख अबु महदी अल-मुहानदीस यांचा मरण पावलेल्यांत समावेश आहे. हा हल्ला शुक्रवारीपहाटे झाला. त्यात हे दोघे शहीद झाले, असे पीएमएफच्या निवेदनात म्हटले आहे.
इसीसशी लढण्यासाठी शिया निमलष्करी दलाची स्थापन केलेल्या पीएमएफचे इराणशी निकटचे संबंध होते. 2016च्या कायद्यानुसार हे स्वतंत्र लष्कर होते. ते केवळ इराकच्या पंतप्रधानांना बांधील होते. सोलेइमानी आणि त्याच्या दलाने हजारो अमेरिकन आणि मित्रराष्ट्रांच्या जवानांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते. इराकमधील अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या तळावर अलिकडे झालेल्या हल्ल्यांची योजना सोलेइमानीने आखली होती, असे पेंटॅगॉनच्या सुत्रांनी सांगितले.
सोलेइमानीच्या मृत्यूबद्दल इराणने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष आयातुल्ला खोमेनी यांनी या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असे म्हटले आहे.
सोलेइमानी याच्या मृत्यूने इराणच्या आण्विक प्रकल्पावरून ताणले गेलेले अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक बिघडणार आहेत. बगदादमधील अमेरिकन दुतावासावर झालेल्या हल्ल्याला सोलेइमानीला अमेरिकेने जबाबदार ठरवले आहे.