श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. जोतिबा गणपती चौगुले (वय 36 रा. महागाव, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे या शहीद जवानाचे नाव आहे.
राजुरी सेक्टरमध्ये सोमवारी (दि.16) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. 17 डिसेंबर) दुपारी महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जोतिबा चौगुले जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. ही बातमी समजताच चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.