वेलिंग्टन : तीन वेळेचे आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले न्यूझीलंडचे धावपटू आणि विक्रमवीर पीटर स्नेल यांचे डल्लास येथे शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
New Zealand sport has lost one of its greatest sons.
Rest In Peace Sir Peter Snell. Your feats on the track will continue to inspire for generations. pic.twitter.com/XMpPHyfPkR
— All Blacks (@AllBlacks) December 13, 2019
मध्यम पल्ल्याचे महान धावपटूंपैकी एक असलेले स्नेल यांनी १९६० च्या रोम आॅलिम्पिकमध्ये २१ व्या वर्षी ८०० मी दौड जिंकली होती. साल १९६४ च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये त्यांनी ८०० आणि १५०० मी स्पर्धेत सुवर्णपदक जिकलं होते. १९२० नंतर एकाच आॅलिम्पिकमध्ये (८०० मी आणि १५०० मी ) दोन पदके जिंकणारे ते पहिले पुरूष खेळाडू होते. त्यांच्यानंतर कोणताही धावपटू अशी कामगिरी करू शकला नाही.
स्नेल यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही दोन सुवर्णपदके पटकावली होती. त्यांनी पर्थमध्ये १९६२ मध्ये ८८० यार्ड आणि १ मैलची दौड जिंकली होती.