पुणे: सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप. फेसबुकच्या मालकीचे असलेल्या या व्हॉट्सअॅप ने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी पासून काही मोबाईल मधून व्हॉट्सअॅप हद्दपार होणार आहे. यामध्ये तुमचा फोन तर नाही ना ?
मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात. या अपडेट्स मधून व्हॉट्सअॅप काही फोन मधून हद्दपार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅप वापरणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे करणं आवश्यक असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंपनी आपल्या अॅपमध्ये अनेक वेगवेगळे फिचर्स आणि सिक्युरिटी अपडेट्स देत आहे. कंपनीच्या या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. 1 फेब्रुवारीनंतर एन्ड्रॉइड, आयइओएस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती कंपनीने वेबसाइटवर दिली आहे.
1 फेब्रुवारी 2020 पासून ios8 आणि त्याआधीच्या मॉडेल्समधील व्हॉट्सअॅप सुविधा बंद होणार आहे. आयफोन 6 आधीच्या सर्व मॉडेल्समधून ही सुविधा बंद करण्यात आली आहे. तर आयफोन 6 नंतरच्या मॉडेलमध्ये हायसिक्युरिटी असलेलं व्हॉट्सअप वापरण्यात येणार आहे. ज्यांचे टु जी फोन असलेले जुने अॅन्ड्रॉइड फोन आहेत अशा म्हणजेच 2.3.3 वर्जन असणाऱ्या ग्राहकांना व्हॉट्सअॅप ची सुविधा उपलब्ध होणार नाही.