रावंळपिंडी : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेने पहिला डाव ६ बाद ३०८ धावांवर घोषित केला. तीन दिवसाच्या पावसाच्या व्यत्ययानंतर आज अखेरच्या आणि पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला असल्यामुळे हा कसोटी सामना अनिर्णित राहणार हे निश्चित झालं आहे.
Sri Lanka declared on 308/6 (97 ov) Dhananjaya de Silva 102* pic.twitter.com/Z5Ehhnvfs1
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) December 15, 2019
आज पाचव्या दिवशी ६ बाद २८२ वरून पुढे खेळताना श्रीलंकेने आपला पहिला डाव ६ बाद ३०८ वर घोषित केला. कालच्या नाबाद ८७ धावावरून पुढे खेळताना धनंजया डि सिल्वाने आज कारकिर्दीतील ६ वे शतक झळकावल. श्रीलंकेने डाव घोषित केला तेव्हा धनजया डि सिल्वा नाबाद १०२ आणि दिलरूवान परेरा नाबाद १६ धावांवर खेळत होता. श्रीलंकेकडून दिमुथ करूणारत्ने ५९, ओशदा फर्नांडो ४०, निरोशन डिकवेला ३३ आणि एजेलो मैथ्यूजने ३१ धावा केल्या.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहीन अफरीदी आणि नसीम शाहने प्रत्येकी २ गडी बाद केले. मोहम्मद अब्बास आणि उस्मान खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.