दुबई : आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीच्या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं टाॅप-१० मध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेशविरुध्दच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. ७७१ अंकासह शामी दहाव्या स्थानी आहे. शामी व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय गोलंदाज टाॅप-१० मध्ये आहेत. दुखापतीमुळं सध्या संघाच्या बाहेर असलेला बुमराह पाचव्या तर आर. आश्विन नवव्या स्थानी आहे.
👉 Holder, Philander, Hazlewood gain one spot
👉 Shami enters top 10The latest @MRFWorldwide ICC Test Rankings for bowling: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/upfW0bcKQ7
— ICC (@ICC) December 4, 2019
गोलंदाजीत आॅस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी कायम आहे. तर आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा दुस-या स्थानी आहे. विंडिजच्या जेसन होल्डरला अफगाणिस्तानविरूध्द केलेल्या कामगिरीमुळं एका स्थानाचा फायदा झाला असून तो तिस-या स्थानी पोहचला आहे.
न्यूझीलंडचा गोलंदाज नेल वॅगनर चौथ्या स्थानी विराजमान आहे. पाकविरूध्दच्या कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टाॅर्क १४ व्या स्थानी पोहचला आहे.