मुंबई – सध्या राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सोशल मीडियावर एक वेगळाच अंदाज दिसून येत आहे. नुकतंच मुनगंटीवार यांच्या मुलीचे म्हणजेच ‘शलाका मुनगंटीवार’ हिच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, या संगीत कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह गाण्यावर ताल धरला होता. त्यांची ही हटके स्टाईल पाहून कार्यक्रमातील सगळे प्रेक्षक त्यांच्याकडे बघतच राहिले होते.