मॉस्को – पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांवर अवलंबून असतात. प्रत्येक गरज भागण्यावसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. आणि हेच पैसे कमावण्यासाठी माणसाला खूप मेहनत देखील घ्यावी लागते. दरम्यान, लोकांना याच पैशाची ताकद कळावी व ते कमवण्यासाठी प्रेरित करणे या उद्देशाने मॉस्को शहरात 7 कोटी रुपयांचे आलिशान सिंहासन तयार करण्यात आले.
Russian entrepreneur Igor Rybakov and pop artist Alexei Sergiyenko have created a glass throne filled with a million dollars pic.twitter.com/UgixBAPy9l
— Reuters (@Reuters) December 1, 2019
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरातील एका आर्ट म्यूझियममध्ये 2.5 इंच बुलेटप्रुफ काचेचे आलिशान सिंहासन ठेवण्यात आले असून, “एक्स10 मनी थ्रोन” असे या सिंहासनाचे नाव आहे. या सिंहासनाची एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये 7 कोटी रुपयांच्या (1 लाख डॉलर) नोटा ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच या सिंहासनावर बसण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बोलवण्यात आले आहे.
हे सिंहासन रशियाचा पॉप कलाकार एलेक्सी सर्जियेंकोने उद्योजक इगोर राइबाकोवबरोबर मिळून बनवले आहे. सिंहासन बनवणे आणि यावर नागरिकांना बसायला बोलवणे या मागचा उद्देश म्हणजे, लोकांना पैशाची ताकद कळावी व ते कमवण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. आणि कदाचित असे झाले तर आपला देश अधिक श्रीमंत होईल, असे एलेक्सी सर्जियेंको यांनी म्हंटल आहे.