मुंबई – मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नेहा तिचा प्रियकर शार्दुल सिंहसोबत पुढच्या वर्षी (५ जानेवारी) लग्न करणार आहे. एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने हा खुलासा केला आहे.
दरम्यान, शार्दुल आणि नेहाने अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचं देखील तिने सांगितलं आहे. नेहाने कॅप्टन हाउसमधून बालकलाकार म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली होती. मात्र नेहाला बिग बॉसमधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.