उंब्रज – पुणे-बंगळूरु महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला.
या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात बसच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. कमल कडू न्हावी (सोनवणे) वय 65), आशा संजय कडू न्हावी (सोनवणे), दिपाली हिरालाल खोंडे (वय 26), मीराबाई यशवंत खोंडे (वय 45) यासह अन्य तीन प्रवाशांच्या जखमींमध्ये समावेश आहे.