मुंबई – अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयावर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विटरवर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram ??? pic.twitter.com/FmpRkpY5Ay
— Virender Sehwag (@virendersehwag) November 9, 2019
सेहवागने ट्विटरवर एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो श्रीरामांचा आहे. त्यासोबत ‘श्री राम जय राम जय जय राम’ अशा ओळी लिहिल्या आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. ३ महिन्यांच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.