मुंबई – सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. शिवसेना कोणाच्या सोबतीने सरकार स्थापन करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गोंधळात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut arrives to meet NCP chief Sharad Pawar at his residence. pic.twitter.com/Zeg6htzUmI
— ANI (@ANI) November 6, 2019
दरम्यान, राऊत आज शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे ही राज्यातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे असे सांगितले आहे.
पवारांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की “पवार साहेब हे राज्याचे आणि देशाचे वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ते अस्वस्थ आहेत”. या पार्श्वभूमीवर आम्ही आज चर्चा केल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut after meeting NCP chief Sharad Pawar, in Mumbai: He is a senior leader of the state & the country. He is worried about the political situation in Maharashtra today. We had a brief discussion. pic.twitter.com/PtXzll0rRC
— ANI (@ANI) November 6, 2019
भाजपा आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.