सोमेश्वरनगर: सोमेश्वरनगर मधील करंजे ग्रामपंचायत (ता बारामती )यांची बुधवार दि २३ रोजी करंजे सरपंच जया संताजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड करण्यात आली.
पूर्वीचे उपसरपंच कालिदास सावंत यांनी स्वइच्छेने पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे या पदावर राजश्री गायकवाड यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ,ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर व कर्मचारी उपस्थितीत होते .