सारा अली खानने आपला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यामध्ये ती किक बॉक्सिंग करताना दिसते आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “हा वीक एन्ड काही तरी वेगळे करण्याचा आहे.’ असेही तिने म्हटले आहे. तिला अचानक किक बॉक्सिंग का शिकायला लागले, हे एक कोडेच आहे. कारण तिच्याकडे ऍक्शनचा असा कोणताही सिनेमा सध्या तरी नाही. यापूर्वी रणवीर सिंह बरोबर “सिंबा’मध्ये काम केलेल्या साराचे दोन सिनेमे लवकरच रिलीज होणार आहेत.
वरुण धवनच्या बरोबर “कुली नं 1′ आणि कार्तिक आर्यनबरोबर “लव्ह आज कल 2′ हे दोन्ही सिनेमांमध्ये तिला ऍक्शन रोल नाही. उलट कॉमेडी आणि रोमॅंटिक रोल आहेत. “कुली नं 1′ पुढच्या वर्षी 1 मे रोजी रिलीज होणार आहे. तर “लव्ह आज कल 2′ च्या रिलीजची तारीख अद्याप निश्चित नाही. पण लवकरच ती जाहीर होईल, अशी आशा आहे.
साराला अचानक किक बॉक्सिंग शिकायला लागण्यामागचे कारण काही जाहिरातींच्या असाईनमेंट असू शकते. पण त्या प्रॉडक्ट किंवा उपक्रमांबाबत तिने आपल्या पोस्टमध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. पण खरेच तिला काही नवीन शिकण्याची इच्छा काही वाईट नाही.