सुपरशेअर: आयआरसीटीसी

मागील सोमवारी बाजारात नोंदणी झालेला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (खठउढउ) या सरकारी कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी चांगलाच गाजला. 320 रुपयांना आलेला आयपीओ थेट दुप्पटीवरच उघडला. तमाम गुंतवणूकदारांची लाडकी बनलेल्या कंपनीच्या 645 कोटी रुपयांच्या आयपीओस 112 पट प्रतिसाद मिळाल्यामुळं नोंदणीच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणं शेअरचा भाव खूप वरती उघडूनसुद्धा त्यात खरेदी झाली व भाव थेट 626 रुपयांवरून 727 रुपयांवर बंद आला.

त्यादिवशी एकूण साडेचार कोटी शेअर्सचे व्यवहार झाले.नंतर पुढील पाच दिवसातदेखील त्यात पडझड न होता आठवड्याच्या शेवटास त्याचा भाव 790 रुपयांपर्यंत वधारला. इतकी लोकप्रियता मिळण्याचं कारण म्हणजे सरकारी अखत्यारितील सरकारी मक्त्‌याची अशी एकच कंपनी जिला कोणीही थेट सम-स्पर्धक नाही आणि म्हणूनच अशा कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी उड्या पडल्या.

विमान, रेल्वे, क्रूझ, स्थलदर्शन इ. पॅकेज टूर्स, हॉटेल बुकिंग, रेल्वे तिकीट बुकिंग सेवा, रेल्वे खान-पान सेवा देणाऱ्या कंपनीचे या वर्षातील उत्पन्न 1868 कोटी रुपये असून नफा 372 कोटी रूपयांवर आहे. एकूणच, रेल्वे बुकिंगमधील सुधारणा व नेहमीच असलेली प्रचंड मागणी पाहता दीर्घ मुदतीसाठीही शेअर सुपरशेअर ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.