भारताचाच नव्हे; चीनचा जीडीपी 27 वर्षांतील नीचांकावर

पेईचिंग – सध्य जगभर आर्थिक मंदीचे वातावरण असताना, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अनेक देशांमध्ये “श्‍ट डाऊन’ची मोहिमही सुरु आहे. अशातच आर्थिक महासत्ता समजल्या जात असलेल्या साम्राज्यवादी चीनचा आर्थिक विकासदर (जीडीपी) मागील 27 वर्षांतील नीचांकावर आला आहे. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपीचा वेग मंद राहिला आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धामुळे हा फटका बसल्याची नोंद आहे.

जुलै ते सप्टेंबर तिमाहीत चीनचा जीडीपी दर 6 टक्‍क्‍यांच्या वेगात राहिला असून दुसऱ्या तिमाहीतही तो 6.2 टक्‍क्‍यांवर होता. संपूर्ण आर्थिक वर्षात चीनचा जीडीपी 6.0 ते 6.5 टक्‍क्‍यांवर राहणार असल्याचे अनुमान आहे. देशांतर्गत व जागतिक स्तरावरील संकटाचा सामना देश करत असल्याचे नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्‍सचे माओ शेंगयॉन्ग यांनी म्हटले आहे.

चीनचा बहुतांश व्यापार हा भारतासह दक्षिण आशियाई देशांशी चालतो. या प्रदेशातले बहुतांश देश आजही विकसनशील असल्याचे मानले जाते. त्यामुळे जागतिक मंदीचे सर्वाधिक दुष्परिणाम हे दक्षिण आशियात दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसत असून अनेक कंपन्यांमधील तयार माल गोडाऊनमध्येच पडून असल्याचे चित्र आहे. तयार माला उठाव नसल्याने, व्यापार मंदावला आहे. त्याचा परिणाम चीनच्या जीडीपी अर्थात सकल घरेलू उत्पन्नावर होत असल्याचे मत शांघाय आणि पेईचिंगमधील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.