मुंबई – मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे. त्यामुळेच आपल्या चाहत्यांच्या मनात तिने आपले घर निर्माण केले आहे. दरम्यान, ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे.
स्पृहाचा जन्म 13 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. ‘दे धमाल’ या मालिकेमुळे ती पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या स्पृहाला लेखनाची देखील तितकीच आवड आहे.
View this post on Instagram
मुंबईतील बालमोहन विद्यामंदिरमध्ये तिचं शिक्षण झाले. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा ‘बालश्री2003’ पुरस्कारही मिळाला आहे. उत्तम अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेली स्पृहा ही एक उत्तम कवयित्रीदेखील आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी स्पृहाला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
View this post on Instagram
How to solve No. 4 ? problem…माझाही विचार करायला हरकत नाही ??? #ICCCricketWorldCup #INDvsWI