फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर यांचे अफेअर ही बॉलिवूडमधील जूनी खबर आहे. यापूर्वी दोघांनाही कैकवेळेला एकत्र बघितले गेले आहे. आताही काही दिवसांपूर्वी हे दोघेही एकत्र दिसले होते. त्यावेळी त्यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरलही झाला होता. यावेळी फरहानची मुलगीही या दोघांच्याबरोबर होती. यामुळे फर्हानच्या या रिलेशनशीपल त्याच्या मुलांकडून काहीही आक्षेप नाही, हे स्पष्ट झाले आहे.
फरहान अख्तरचा “तुफान’ लवकरच येतो आहे. यामध्ये त्याला एका बॉक्सरचा रोल करायचा आहे. या “तुफान’चे पहिले पोस्टर आज रिलीज झाले. या पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग रिंगमध्ये दिसतो आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. “तुफान’मध्ये दर्शन कुमार मुख्य खलनायकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रातील मुष्टीयोद्धा धर्मेश पाटीलच्या करिअरवर “तुफान’ची कथा आधारलेली आहे.
यापूर्वी देखील फरहान अख्तरने एका खेळाडूचा बायोपिक केला आहे. “भाग मिल्खा भाग’मध्ये धावपटू मिल्खा सिंग यांच्या रोलमध्ये फरहान अख्तरने एकदम बहार आणली होती. त्याच्या रोलमध्ये जेवढे प्रामाणिक कष्ट तो घेतो, तेवढाच प्रामाणिकपण रिलेशनशीपमध्येही असावा, म्हणून तर त्याच्या कन्येने शिवानी दांडेकरबरोबरच्या रिलेशनशीपला आक्षेप घेतलेला नसावा.