अक्षय कुमार, सैफ अली खानचा ‘मै खिलाड़ी तू अनाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज तब्बल 25 वर्षे उलटली आहेत. 1994 साली तुफान लोकप्रिय झालेल्या या चित्रपटासाठी सैफ अली खानच्या रोलसाठी बॉलिवूडचा बादशहा शाहरूखला विचारण्यात आले होते. मात्र, शाहरूख खानने अक्षय कुमार सोबत काम करण्यास त्यावेळी नकार दिला होता.
त्या काळात अक्षय हा ऍक्शन हिरो म्हणून जास्त लोकप्रिय होता तर शाहरुख प्रेमाचा बादशहा म्हणून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत होता. या चित्रपटातील भुमिकाही त्या दोघांच्या इमेजशी साजेश्या होत्या. चित्रपटातील दुसरी महत्त्वाची भूमिका करण्याबद्दल शाहरुख खानला विचारण्यात आले होते.
मात्र, शाहरूखने ही भुमिका साकारायला नकार दिला. शाहरूखला अक्षयसोबत काम करायच नव्हत. चित्रपट यशस्वी झाला तर सर्वाधिक लोकप्रियता अक्षयला मिळेल या विचाराने शाहरुख अस्वस्थ झाला होता.
त्यामुळे त्याने चित्रटातील अक्षयच्या रोलसाठी आधी ओम पूरी किंवा नसीरुद्दीन शाह यांचेही नाव सुचवले होते. मात्र, निर्मात्यांनी ती भुमिका अक्षयचीच असल्याचे सांगितले.
मात्र, शाहरूखच्या नकारानंतर त्या भुमिकेसाठी सैफची निवड चित्रपटासाठी करण्यात आली. हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झालेल्या द हार्ड वेचा रिमेक असल्याचे म्हटले जात आहे.