सासवड- शहरात डेंग्यू सदृश्य आजारांनी थैमान घातले आहे. डासांचे प्रमाण आणि रूग्णांची संख्या रोखण्याच्या हेतुने शिवसेनेतर्फे शहरामध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात आली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून औषध फवारणीचे तीन पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या माध्यमातून दिवसातून दोन वेळा फवारणी केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरवात शहरातील सोपाननगर भागातून झाली. यावेळी दिलीप यादव, कुंडलीक जगताप, प्रकाश जगताप, शाम जगताप, मंगेश जगताप, विकास नाळे, संतोष जगताप, सुनील जगताप,हेमंत सुकल, सचिन देशमुख, सुशील घोडके, राहुल घोडके, केदार क्षीरसागर, मंगेश भिंताडे उपस्थित होते.