चिन्मयानंदला आरोप कबूल

अटक होताच छातीत वेदना, अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार

शाहजानपूर : भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणात अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश एसआयटीने ही कारवाई केली. त्यांना १४ दिवस न्यायलयीन कोठडीत टेवंण्याचे आदेश न्यायलयाने दिले.

चिन्मयानंदला आरोप मान्य?
या युवतीने चिन्मयानंद बलात्कार करत असतानाचे छायाचित्रण चष्म्यातील कॅमेर्‍याद्वारे केले होते. त्याचे व्हिडिओ चित्रण त्याला दाखवण्यात आले.त्यावेळी त्याने या व्हिडिओचे सत्यता कबूल केली. त्याने याची शरमवाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. या कारवाईत कोणतीही दिरंगाई झाली नाही. चिन्मयानंद दोन दिवस रुग्णालयात होता. तेथून बाहेर आल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेतली. आमची खात्री पटली तेव्हा आम्ही अटक केली. त्याने हे पुरावे मान्य केले, असे सर्वोच्च न्यायलयाने नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख नवीन आरोरा यांनी सांगितले, असे वृत्त एनडिटिव्हीच्या संकेतस्थळाने दिले आहे.

येथील न्याय दंडाधिकार्‍यांपुढे चिम्यानंदने बलात्कार केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. आपल्या आश्रमामार्फत चालवल्या जाणार्‍या महाविद्यालयात शिकणार्‍या युवतीवर चिन्मयानंदने वर्षभर बलात्कार केला होता. त्याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवूनही चिन्मयानंदवर कारवाई होत नव्हती. त्याला अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या युवतीने दिला होता.

या युवतीने दिल्ली पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून एसआयटीने चिन्मयानंद या.ंना अटक केल्याची माहिती मला मिळाली आहे, असे त्याचे वकील ओमसिंग यांनी पत्रकारांना सांगितले. शहाजानपूर सरकारी रुग्णालयात दोन दिवस उपचार घेणारा चिन्मयानंद गुरूवारी आश्रमात परतला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याने छातीत दुखत असल्याचे आणि अस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यास सुरवात केली. त्याला अँजिओग्राफी करण्याचा आणि त्यासाठी लखनौ येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, असे त्याचे वकील ओमसिंग यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.