निकालासाठी अधिकृत संकेतस्थळ : maharesult.nic.in
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 30 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
दहावी फेरपरीक्षा 17 ते 30 जुलै 2019 रोजी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंटआऊट घेता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर दि.31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच, उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची आहे. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे