मराठी अभिनेत्री अमिता खोपकर आता लवकरच एका हिंदी सिरीयलमध्ये दिसणार आहे. आनंदी, उत्साही आणि काहीसा विनोदी रोल असलेल्या “तारा फ्रॉम सितारा’ या सिरीयलमध्ये अमिता खोपकर आधुनिक आजीबाईच्या रूपात दिसणार आहे.
उपेंद्र लिमये आणि तारा माने यांच्या आजीचा रोल त्या करणार आहेत. उद्देशहीन जीवन जगत असलेल्या ताराला तिची आजी नेहमीच समर्थन करत असते. अत्यंत फन लव्हिंग, फ्रेंडली आजीचा रोल आपल्यासाठी खूपच वेगळा असल्याचे त्या सांगतात. आपल्या सुनेला सांभाळून घेण्याचा हा रोल करताना त्या काही चेष्टामस्करी आणि विनोदही करताना दिसणार आहेत.