तळेगाव दाभाडे – कापड दुकानाचे शटर उचकटून कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख 94 हजार रुपयांचे टी-शर्ट व जीन्स पॅन्टसह रोख सहा हजार 210 रुपये चोरून नेले. तळेगाव दाभाडे येथे तपोधाम कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 5) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी संदेश विश्वनाथ हात्तुरे (वय 33, रा. तळेगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली.
रविवारी (दि. 4) रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता दुकानाच्या शटर उचकटले दिसले. तसेच कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 94 हजार रुपयांचे टी-शर्ट व जीन्स पॅन्टसह सहा हजार 210 रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.