चित्रपटसृष्टीत सतत वेगळे रोल साकारून आपल्या प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देणाऱ्या ऍक्टर्समध्ये अभिनेता अक्षय कुमारचे नाव अव्वल आहे. सध्या अक्षय कुमारचे मिशन मंगल आणि सूर्यवंशी हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून आता या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.
Coming on Christmas 2020!
In & As #BachchanPandey ?
In #SajidNadiadwala’s Next, directed by @farhad_samji @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/ayMkzwPEsJ— Akshay Kumar (@akshaykumar) July 26, 2019
दरम्यान, अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या आगामी “बच्चन पांडे” चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला. या पोस्टर मध्ये त्याने काळया रंगाची लुंगी, गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि कपाळावर चंदन असा अवतार केला आहे. त्यामुळे बच्चन पांडे चित्रपटात प्रेक्षकांना अक्षयचा एक हटके अंदाज दिसून येणार हे नक्कीच. हा चित्रपट 2020 च्या नाताळमध्ये रिलीज होणार असून, चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला हे आहेत.