#Prokabaddi2019 : विजयासाठी तेलुगु टायटन्सचा निर्धार

तेलुगु टायटन्स vs पाटणा पायरेट्‌स

स्थळ – हैदराबाद
वेळ – रात्री 8-30 वा.

हैदराबाद – हर बिल्ली अपने गली मे शेर होती है असे म्हटले जाते. मात्र, तेलुगु टायटन्स संघासाठी नेमके उलटेच घडले आहे. घरच्या मैदानावर झालेल्या तीनही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ही अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी त्यांना पाटणा पायरेट्‌ससारख्या बलाढ्य संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

तेलुगु संघास पहिल्या दोन सामन्यात यू मुंबा व तमिळ थलाईवाज संघाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी दबंग दिल्लीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, केवळ एक गुणाने त्यांनी हा सामना गमावला होता. या लढतींपासून बोध घेत ते आज चांगला खेळ करतील, अशी अपेक्षा आहे.

त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला पाटणा संघ संभाव्य विजेता संघ मानला जात आहे. त्यांच्याविरुद्ध विजय मिळविणे सोपे नाही. त्यामुळेच त्यांना सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. पाटणाने सलग तीन वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळवित इतिहास घडविला आहे. परदीप नरवाल याच्या नेतृत्वाखाली पाटणा संघ चढाया व पकडी या दोन्ही आघाड्यांवर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून ख्यातनाम आहे.

तेलुगु टायटन्स

बलस्थाने – घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा
खोलवर चढाया करण्याची क्षमता

कच्चे दुवे – तीन पराभवाचे मानसिक दडपण
सांघिक कौशल्याचा अभाव

पाटणा पायरेट्‌स

बलस्थाने – तीन वेळा अजिंक्‍यपद मिळविल्याचा मानसिक फायदा
उत्कृष्ट सांघिक कौशल्य

कच्चे दुवे – महत्त्वाच्या क्षणी खेळावर नियंत्रण नाही
फाजील आत्मविश्‍वास

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.