#Prokabaddi2019 : यू पी योद्धासमोर गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सचे आव्हान

यू पी योद्धा विरूध्द तेलुगु टायटन्स

स्थळ – हैदराबाद
वेळ – रात्री 7-30 वा.

हैदराबाद – प्रो कबड्डी स्पर्धेत आज दोन लढती होणार आहेत. पहिल्या लढतीत यू पी योद्धा संघापुढे गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌स संघाचे आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या लढतीत तेलुगु टायटन्स संघापुढे बलाढ्य पाटणा पायरेट्‌सचे आव्हान असेल.

यु पी योद्धा संघाचा पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने दणदणीत पराभव केला होता. या पराभवापासून ते बोध घेतील अशी अपेक्षा आहे. या सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी सर्वच आघाड्यांवर निराशा केली होती. बंगाल वॉरियर्सने या सामन्यात अतिशय अव्वल दर्जाचा खेळ करीत आपल्याकडे अजिंक्‍यपद मिळविण्याची क्षमता आहे याची झलक दिली आहे. यू पी योद्धास गुजरातविरुद्ध सर्वोत्तम क्षमता दाखवावी लागणार आहे. स्पर्धेतील पदार्पणापासून गुजरातने बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळविला आहे.

यु पी योद्धा

बलस्थाने – युवा खेळाडूंचा अधिकाधिक समावेश, शारीरिक तंदूरुस्तीत वरचढ
कच्चे दुवे – सांघिक समन्वयाचा अभाव, चढाया व पकडीमध्ये अनेक चुका

गुजरात फॉर्च्युन जाएंटस

बलस्थाने – उत्कृष्ट संघबांधणी, आक्रमक चढायांवर भर
कच्चे दुवे – पकडीमध्ये अक्षम्य चुका, काही वेळा खेळावर नियंत्रण नाही

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)