नवी दिल्ली: सेक्रेड गेम्स या वेब सिरिजमध्ये अभिनय करणाऱ्या एल्नाज नोरौजी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर रोखल्याचा प्रकार घडला आहे. ती मुळची इराणची असल्याने शिकागो विमानतळावर तीन तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी चौकशी करण्यात आली. यामुळे तिला आपली फ्लाईटदेखील सोडावी लागली.
तब्बल तीन तास आपल्याला चौकशीसाठी इमिग्रेशनमध्ये थांबावे लागले असल्याचे एल्नाजने सांगितले. तसेच यादरम्यान तिला कनेक्टिंग फ्लाईटदेखील सोडावी लागली. माझ्याकडे जर्मनीचा पासपोर्ट आहे. त्यामुळे अमेरिकेत प्रवास करताना व्हिसाची गरज भासत नाही. परंतु ट्रम्प प्रशासनाने ईराणवर लावलेल्या निर्बंधांमुळे मी व्हिसासाठी अर्ज केला आहे. परंतु निर्बंधांमुळे ईराणी नागरिकांची हे अधिकारी बरेचदा चेकींग करतात, असेही ती म्हणाली.