शिरूर- शिरूर शहराल उद्या (दि.१३ जुलै ) पासून नियमित दररोज पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार यांनी दिली आहे.
शिरूर शहराला घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हपुर पद्धतीचा बंधारातून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसापूर्वी पाऊसाने दिलेली ओढ व धरणक्षेत्रातील आटलेले पाणी यामुळे शिरूर शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नियमित पणे होणा-या पाणीपुरवठा सुरुवातीला दोन दिवसाआड आणि त्यानंतर तीन दिवसाआड केला जात होता. त्यामुळे साहजिकच शहराचा पाणी पुरवठा नियमित कधी होणार याकडे सर्व शिरूरकरांचे लक्ष लागले होते.
काही दिवसापासून धरणक्षेत्र व आसपासचा परिसरात होत असणा-या पाऊसाने नदी मध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.
नदी मध्ये पाणी वाढत असल्याने यापुढे शहराला नियमितपणे पाणी पुरवठा करण्या संदर्भात पवार यांनी नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल , नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी अँलीस पोरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनतर शिरूर शहराला उद्या दिनांक १३ जुलै पासून नियमित दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगतिले.