लखनौ-अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने शुक्रवारी भाजपच्या नेत्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांची रिट याचिका फेटाळली. जयाप्रदा यांनी त्या याचिकेद्वारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या निवडीला आव्हान दिले होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा यांना भाजपने उत्तरप्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या मतदारसंघात खान यांनी विजय मिळवला. त्यांच्या निवडीला जयाप्रदा यांच्याकडून आव्हान देण्यात आले. मात्र, कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करत लखनौ खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली.
रामपूर थेट उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. त्याशिवाय, संबंधित प्रकरणात रिट याचिकेचा विचार होऊ शकत नाही. रिट याचिकेऐवजी निवडणूक याचिका सादर केली जाऊ शकते, असेही खंडपीठाने नमूद केले.