जनरलला टाकले पिरान्हा माशांच्या टॅंकमध्ये
सेऊल – उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनचा क्रूरपणा पुन्हा एकदा जगासमोर आला असुन त्याने आपल्याच जनरला पिरान्हा माशांच्या तलावात फेकुन निर्घृण हत्या केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. जनरलवर किम जोंग उनच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप होता. किमला जनरलच्या प्रामाणिक असण्यावर संशय आल्याने त्याने जनरलला अशाप्रकारे क्रूर पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
दरम्यान, किमने जनरलचे हात शरीरापासून वेगळे केले आणि त्याला पिरान्हा मासे असलेल्या तलावात फेकल्याचे वृत्त ब्रिटन येथील आघाडीचे वृत्तपत्र डेली स्टारने दिले आहे. त्याने आपल्या घरात ठेवण्यासाठी ब्राझीलवरून हे पिरान्हा मासे मागवले होते. पिरान्हा मासा हा जगातील सर्वात नरभक्षी आणि हिंस्र मासा आहे. या माशांच्या दातांना खूप धार असते. या दातांनी ते एका माणसाला कापू शकतात. माणसांसाठी हा मासा धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या आपल्या दूतांसह पाच अधिकाऱ्यांची त्याने निर्दयीपणे हत्या केली होती. त्याच्या या कृत्याचा सर्व स्तरातुन जाहिर निषेध करण्यात येत आहे.