मुंबई : पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा आणि खराब हवामानामुळे मुंबईतील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवांना 20 मिनिटे विलंब होत असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai International Airport: Flight delays of over 20 minutes reported at Mumbai airport due to bad weather. #Maharashtra
— ANI (@ANI) June 12, 2019
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात वादळ निर्माण झाले आहे.