नवी दिल्ली- १३ ते १४ जून रोजी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाऊ शकणार आहे. बालकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती. त्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानला वळसा घालून जावे लागत होते.
दरम्यान, आता पंतप्रधान मोदींसाठी पाकिस्तानने भारताची विनंती सोमवारी मान्य केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी या बैठकीला सहभागी होणार आहेत.