चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथे मंगळवार (दि. 11) आठडे बाजाराचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेती, जनावरांच्या दूध विषयी तसेच आरोग्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सातारा येथील धन्वंतरी ग्रुपच्या शेतकऱ्यांना डॉ. प्रतापसिंह माने, नवनाथ जगताप, राहुल सावरकर, डॉ. यंशवत पाटील, ज्ञानेश्वर काळे यांनी शेतकरी वर्गाना मार्गदर्शन केले. यावेळी खेड तालुका विक्री सघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सरपंच अनिल लोखंडे, रोहिदास लोखंडे, सचिन लोखंडे, उपसरपंच लाला लोखंडे, तृप्ती लोखंडे, अनिता लोखंडे, दशरथ लोखंडे, सरपंच तृप्ती लोखंडे, अध्यक्ष अनवनाथ लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे, संतोष भुसे, उमेश वर्पे आदि मान्यवरांसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.