पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डतर्फे वक्फ टास्क फोर्स यांना पाच वेळा स्थायी प्रार्थना करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
कोंढवा बुद्रुक आलमगीर मशीद येथील सर्वेक्षण क्रमांक 55 मध्ये स्थायी प्रार्थना करण्यासाठी ही परवानगी दिली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डची येथे 44.4 एकर जमीन आहे.
मुफ्ती शाकीर खान यांनी रमजान ईदच्या दिवशी ऐतिहासिक मशीदमध्ये नमाज पठण केले. यावेळी वक्फ टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला, आयकर विभागाचे निवृत्ती मुख्य आयुक्त ए. जे. खान, राबत फाउंडेशनचे सय्यद सईद अहमद, सोहेल शेख, मोईद तुंगेकर, सिकंदर पठाण, मजहर शेख, सलीम पाटेकर, अहमद सय्यद, एजाज शेख, वसीम तारकश, फैय्याज खान आणि इतर उपस्थित होते.
विशेष म्हणजे तब्बल चाळिस वर्षांनंतर येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले.