मुंबई – अमेरिकन सरकारने एच-1 बी चे नियम कडक केले आहेत. त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षात भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या नफ्यावर जवळजवळ एक टक्का परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे या काळात भारतीय कंपन्यांचा महसुलात 7 ते 8 टक्क्यांनी वाढून 180 अब्ज डॉलर वर जाण्याची शक्यता आहे.
डिजिटल सेवा आणि इतर क्षेत्रातून या कंपन्यांना अधिक ऑर्डर मिळणार असल्यामुळे महसूल वाढेल. मात्र, या कंपन्यांचा महसूल परदेशात गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. व्हिसा कडक केल्यामुळे भारतातील कर्मचारी परदेशात जाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्याचा परिणाम या कंपन्यांच्या महसुलावर होऊ शकतो.
अमेरिकेतील कर्मचारी जे काम करतात तेच काम भारतातील कर्मचारी तुलनेने कमी पगारावर काम करतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा नफा वाढतो. मात्र आता ही सोय कमी झाली असल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर आता अमेरिकेतील कर्मचारी आणि भारतातील कर्मचाऱ्याच्या पगारातील तफावत वेगाने कमी होऊ लागली आहे. त्याचाही फटका या कंपन्यांना बसणार आहे.
आता माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यावरील पगाराचा खर्च 90% यावर गेलेला आहे. भारतातून अमेरिकेत गरज नसताना कर्मचारी जातात असे कारण दाखवून अमेरिकेने या व्हिसाचे नियम कडक केले आहेत.